Friday, July 21, 2023

 नमस्कार"

"सर, तुम्ही मला पहिल्या फोनवर नमस्कार केला तेव्हा मला खूप बरं वाटलं." ओलाचा ड्रायव्हर जेंव्हा मी गाडीत बसत होतो तेंव्हा म्हणाला,
मी त्याला विचारले, “का? काय झालं?".
तो म्हणाला. “सर जेव्हा जेव्हा मी ग्राहकाकडून कॉल करतो किंवा कॉल उचलतो तेव्हा ते इतके स्वतःच्या कोषात आत्ममग्न असतात की तुम्ही कुठे आहात, तुम्हाला उशीर का झाला असेच सर्व काही प्रश्न त्यांना पडतात. कधीकधी ते इतके उद्धट असतात की विचारता सोय नाही.‌
ड्रायव्हर म्हणून आम्हीही माणूस आहोत आणि आम्हालाही मन, भावना आहेत याचा विचार नसतो , ते गाडीत बसले असले तरी त्यांच्याकडे फक्त आपल्याकडे बघायला स्मितहास्य करायलाही वेळ नसतो‌.
त्यांना मोबाईल आणि इअरप्लगचे इतके वेड लागलेले आहे की ते कारला अगदी इलेक्ट्रिकल लिफ्टसारखेच मानतात.
कधीतरी विशिष्ट वयोगटातील लोकांकडून असभ्य वर्तन, कारमध्ये धुम्रपान स्वीकारावे लागते.”
मी त्याच्या बोलण्याने सुन्न झालो. "श्रमाच्या प्रतिष्ठे बद्दल आणि इतरांचा आदर करण्याबद्दल लोकांच्या निष्काळजीपणा बद्दल मला खुपचं वाईट वाटले.‌
असंघटित क्षेत्रातील लोकांशी व्यवहार करताना "कामाची प्रतिष्ठा" याची जाणीव प्रत्येक व्यक्तीला असणे महत्त्वाचे आहे. विशेषत: असंघटित क्षेत्रातील बर्याच नोकऱ्यांना भारतीय खंडाच्या काही भागात नेहमीच "कमी कामाच्या प्रतिष्ठेच्या नोकर्या "मानल्या जातात.
महात्मा गांधींचे सुप्रसिद्ध म्हण आहे, ‘एखाद्याला समजून घेण्यासाठी देण्यासाठी, तो व्यक्ती आपल्या खालच्या लोकांशी कसा वागतो ते पहा’.मगच तुम्हाला कसा आहे ते कळेल.‌
आपण जोपर्यंत आपल्या मुलांना "कचरेवाला वो नही, कचरेवाले तो हम है वो तो सफाईवाला है" असं सांगून श्रम प्रतिष्ठेबद्दल शिक्षण देऊ शकलो तर योग्य होणार नाही का?
ग्राफिक डिझायनर जेम्स फ्रिडमन @framie013 यांचे एक ट्विट चित्रात देत आहे. त्याला एका व्यक्तीने चित्रातील कचरा उचलणारी व्यक्ती काढायला सांगितली त्यावर त्याने दिलेले उत्तरादाखल चित्र कामाच्या प्रतिष्ठेचे मूल्य जाणूण देणारे आहे.
प्रशांत पेडणेकर

Thursday, July 6, 2023

 मंत्र "सिद्धीचा" मंत्र "वाचेचा"

चुचुचु, फिसफिस,यूयूयू , विठूविठू आणि काकाका असे काही मराठी शब्द आहेत ते उच्चारले की आपण वेगवेगळ्या प्राण्यांना आपल्याकडे आकर्षित करतो. कुत्रा, मांजर गाई, पोपट, कावळे हे सजीव या आवाजाने तुमच्याकडे पहातात किंवा आकर्षित होतात. आता हे होण्यासाठी या प्राण्यांच्या आधी कोणी शिकवले नसते पण तरीही ते तुमच्याकडे येतात ही शब्दाची ताकद आहे. अशाच शब्दांना याला पाश्चात्य लोक युनिव्हर्सल लंग्वेज,व्हाईब्ज, लॉ ऑफ अट्रक्शन असे म्हणतात...
म्हणून संत कबीर म्हणतात
शब्द सम्हारे बोलिए, शब्द के हाथ न पाँव
एक शब्द औषधि करे, एक करे घाव
शब्द सांभाळून बोला त्याला जरी हात पाय नसले तरी तो औषधाचे किंवा घावाचे कारण बनतो.
What you think, What you become, तुम्ही जसे विचार करता, तसे तुम्ही बनत जाता.
त्यामुळे भारतीय संस्कृतीत शब्द व त्यांच्या उच्चार यांना अंत्यंत महत्व आहे. भारतीय संस्कृती पुर्णपणे मौखिक आहे. म्हणजे लिखाणापेक्षा बोलणे , मुखोत्गत करणे याला महत्त्व आहे. मंत्र हे याच शब्दांचे प्रतीक आहे.
मंत्र या संस्कृत शब्दाचा अर्थ विचार करणे, मनन करणे असा आहे. मंत्रान त्रायते ईति मनात विचार आणल्या मुळे ज्या गोष्टींचे रक्षण होते तो मंत्र असे म्हटले जाते..
भारतीय संस्कृतीतील प्रत्येक देवतेच्या शक्तीला आपल्या मनात व शरीरात प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या मंत्रांचा वापर केला जातो व वेगवेगळ्या पद्धतीने तो केला जातो. प्रत्येक देवतेच्या सगुण रुप तिची,‌किंवा मंत्राची ताकद सांगत असते व आपण तो पुर्ण गांभिर्याने व सुस्पष्ट म्हणायचा असतो त्यामुळे त्या व्हायब्रेशन्स तुमच्याकडे येतात,
अर्थातच या शक्ती तुम्हाला मदत करण्यासाठी आहेत त्यामुळे तुम्ही तुमचे काम करताना या केल्या पाहिजेत. म्हणजे अभ्यास न करता फक्तं मंत्र म्हणून पास होणार नाही, मंत्र हे कारक म्हणजे कार्य करण्यासाठी मदत करणारे प्रेरणादायी असतात.
देव याचा अर्थ देणारा असा आहे म्हणून तो.याची उपासना भक्ती करायची व त्याचे गुणधर्म आपल्या अंगी बाळगावी ही प्रार्थना करावी लागते.
अं, ऱ्हां, ऱ्हीं इत्यादी एकाक्षरी शब्दांना बीजमंत्र म्हणजेच बीजरूप मंत्र मानले जाते. बीजमंत्रातील एका अक्षरात संपूर्ण मंत्राचे सार एकत्र झाल्याचे मानले जाते आणि अशा अक्षरात बीजाक्षर म्हटले जाते.
श्री गणेशाचा बिजमंत्र गं हा आहे.
त्यानंतरचा देवतेच्या शक्तीला आवाहनाचा मंत्र म्हणजे गायत्रीमंत्र किंवा प्रेरणामंत्र आहे , प्रचोदयात याचा अर्थ प्रेरणा देवो, शक्ती देवो..असा अर्थ आहे..
श्री गणेशाचा गायत्रीमंत्र मंत्र हा खालीलप्रमाणे
एकदन्ताय विद्महे। वक्रतुण्डाय धीमहि। तन्नो दन्ती: प्रचोदयात|
एकदंताची आम्हाला प्राप्ती व्हावी म्हणून आम्ही त्यास जाणतो. वक्रतुंडाला जाणण्यासाठी आम्ही त्याचे ध्यान करतो. तर त्या दंतीने आम्हाला प्रेरणा द्यावी.
तर आज संकष्टी चतुर्थीला फक्त गणपतीला नमस्कार न करता मनापासून प्रेरणामंत्र म्हणजेच गणेश गायत्री मंत्र म्हणून गणेशासारख्या सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी शुभेच्छा...
प्रशांत पेडणेकर..
ता. क. प्रेरणा मंत्रासोबत कार्य सिद्धीस कृती देखील महत्वाची असते. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी हे शक्य नाही.

Saturday, July 1, 2023

 आठवणीतील गाणे.




"नादां परींदे घर आजा" हे राॅकस्टार चित्रपटातील गाणे वरवर जरी पाश्चात्य संगीतातील राॅक संस्कृतीचे प्रतीक असणारे गाणे वाटते. पण जर अर्थासहीत पुन्हा पुन्हा ऐकलं की त्यातला भावगर्भ "प्रेम ही ईश्वर है, आणि ईतर कोणत्याही भौतिक सुखाच्या पेक्षा खरं सुख वेगळंच आहे " असा विचार समजतो...
कागा सब तन खायो चुन चुन खायो मांस ||
दो नैना मत खायो मोहे पिया का आसियान मिला ||
असा मुळ दोहा आहे पंजाबी संत फरीद यांचा.
देवाच्या भेटीची आस लागून त्यांनी अन्नग्रहण पूर्णपणे कमी केले मुठभर धान्यावर ते जगत होते. त्यामुळे त्यांच्या शरीरावरील पुर्ण मांस जाऊन अशक्त झालेल्या शरीरात फक्त डोळेच हा भाग मांसल राहीला होता , अशावेळी ते कावळ्यांना‌ विनंती करत होते की मला माझ्या प्रिय ईश्वराला भेटायचे आहे म्हणून माझे डोळे तेवढे हिरावून घेऊ नकोस....
आणि हेच शब्द इर्शाद कामील याने या गाण्यात घेतलेत.
कागा रे कागा इतनी अरज मोरी चुनचुन खयीयो मांस. |
खय्यौ ना तू नैना मोरी, पिया की मीलनकी है आस||
हे ऐकलं की या गाण्यातल राॅक पणा जाउन‌ एकदम भारतीयत्व येऊन जात.‌
मग आठवतं कैलाश खेर , हरदिप कौर यांनी गायलेलं जाना जोगी दे नाल (कागा सब तन‌ खहियो) हे गाणे किंवा
लता मंगेशकर यांनी गायलेलं "पिया मिलन की आस" या चित्रपटातील कागा सब तन‌ खाईयो हे गाणे.
तसेच इतर परदेशी असणाऱ्या प्रियकराला संबोधित किशोर कुमार यांच्या आवाजातील चाचा झिंदाबाद या १९५९ सालच्या चित्रपटातील
देस छुडाये भेस छुडाये | क्या क्या करे ना प्रीत रामा |
क्या क्या करे ना प्रीत | रंग बदल दे, ढंग बदल दे |
प्रीत की ऐसी रीत रामा | प्रीत की ऐसी रीत |
कागा सब तन खाइयो | चुन चुन खाइयो सब मांस
हाँ हाँ हाँ हाँ
ये दो नैना मत खाइयो || ओ मोहे, ओ मोहे , ओ मोहे
पत, पत, नी, नी पत्नी | पत्नी मिलन की आस
अर्थातच किशोरजींचे गाणं थोडं विडंबनात्मक आहे.‌‌पण भाव‌ तोच आहे.
एकंदरीत स्वतः ला विसरून भौतिक सुखाच्या वेगवेगळ्या पातळीवर अनुभव घेतल्या नंतर "बास्स झालं सगळं " असा विचार येऊन सन्मार्गावर यायच आणि‌ आपलं आत्मिक सुख कशात आहे याचा ध्यास लागणारे हे गाणं आहे...
चित्रपट कथेत जनार्दन ऊर्फ जाॅर्डन हा मनस्वी गायक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचतो, सर्व ऐशोआराम, सुख, सगळं पायाशी असताना व्यसनाधीनता, पराकोटीचा गर्व या सगळ्या गोष्टी सुरू होतात तेंव्हाच त्याची लाडकी प्रेयसी‌ मरणाच्या दारात पोहोचते तेव्हा त्याला कळतं
" हे जगणं म्हणजे एक नरक आहे""....
कारण तुमची निरागसता , शुद्धता तुम्ही गमावली आहे....
आणि मग चालू होतो रिफ्लेक्शन व पश्चात्तापाचा खेळ आणि जाॅर्डन हे गाणे काॅन्सर्ट मधे म्हणायला लागतो.
स्वतःच्या मनाला नादां परींदे म्हणणे व क्यूँ देस विदेस फिरे मारा म्हणणे आणि शरीरावर व्यसनांनी केलेल्या‌ अत्याचाराबाबत व चुकीच्या गोष्टी साठी
सौ दर्द बदन पे फैलै है
हर करमसे कपडे मैले है
म्हणून पश्चात्तापाच्या अग्नीत स्वतः होरपळून जाणं..
आणि पुन्हा पुन्हा मनाला सन्मार्गावर आणून किमान त्यामुळे तरी आपली प्रिय व्यक्ती मरणाच्या दारातून परत येईल असे स्वतःच्या मनाला आश्वासन देणं.....
असा काहीसा हा गाण्याचा प्रकार आहे..
तुमच्या माहितीसाठी पुन्हा त्याचे बोल खाली देत आहे. तसेच वर नमूद केलेली गाण्याची लिंक पण देत आहे..
पण त्या आधी ए आर रहमान व मोहित चौहान यांना मानाचा मुजरा...
तसेच रणबीर कपूर याने तितक्याच ताकदीने हे गाणं सादर केले म्हणून त्याला हि सलाम...
ओ नादान परिंदे घर आजा
ओ नादान परिंदे घर आजा
ओ नादान परिंदे घर आजा
घर आजा, घर आजा, घर आजा आ आ….
क्यूँ देश-बिदेश फिरे मारा
क्यूँ हाल-बेहाल थका हारा
क्यूँ देश-बिदेश फिरे मारा
तू रात बिरात का बंजारा
ओ नादान परिंदे घर आजा
घर आजा, घर आजा, घर आजा आ आ….
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
सौ दर्द बदन पे फैले है
हर करम के कपडे मेले है
काटे चाहे जितना परों से हवाओं को
खुद से ना बच पायेगा तू
तोड़ आसमानों को
फूँक दे जहानों को
खुद को छुपा ना पायेगा तू
कोई भी ले रास्ता, तू है तू में बस्ता
अपने ही घर आएगा तू
ओ नादान
ओ नादान परिंदे घर आजा
घर आजा, घर आजा, घर आजा आ आ….
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
कागा कागा रे मोरी इतनी अरज तोसे
चुन चुन खाइयो मांस
कागा कागा रे मोरी इतनी अरज तोसे
चुन चुन खाइयो मांस
अरजिया रे खाइयों ना तू नैना मोरे
खाइयों ना तू नैना मोहे
पिया के मिलान की आस
खाइयों ना तू नैना मोरे
खाइयों ना तू नैना मोहे
पिया के मिलान की आस
ओ नादान
ओ नादान परिंदे घर आजा
घर आजा, घर आजा, घर आजा आ आ….
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा.
लेख आवडला तर शेअर करायला काही हरकत नाही.
प्रशांत पेडणेकर...

Saturday, July 30, 2022

 लहानपणी परीकथा , राजपुत्र आणि राजाच्या गोष्टी वाचताना कायम तुम्हाला हवा असणारा सोन्याचा पक्षी /शेला/मुकूट/ किंवा जादूची छडी हि कायम कुठेतरी लांब असायची त्या कथा मधे वाचताना सात समुद्र‌ सात नद्या आणि सात पर्वत पार केल्यावर मिळणार असायची आणि राक्षसाचा जीव‌सुद्धा‌ असाच सोन्याच्या पिंजऱ्यात असणाऱ्या पोपटात असायचा कि तो देखील सात समुद्र‌ सात नद्या आणि सात पर्वत सात आग असणाऱ्या दऱ्या पार केल्यावर मिळणार असायचा मग अशावेळी अशा कथांमध्ये भेटणारा साधू , फकिर , बोलणारे झाड तूम्हाला काहीतरी वस्तू किंवा ताईत किंवा ताविज नाहीतर जादूची तलवार बरोबर द्यायचे.... तोच तुमच्या प्रवासातील साथीदार किंवा मार्गदर्शक , तारक किंवा अल्केमिस्ट असतो...

आयुष्याच्या peaks and valleys मधे सोबत साथ असते ती फक्त आत्मविश्वासाची. कदाचीत तोच या गझल मधला रहबर असेल.
बाकी खाली लावलेल्या चित्रातील बौद्ध भिक्खू चा आणि माझा काही संबंध नाही
पण मागचे डोंगर आणि दरी हे सगळं पार करतोय नक्की. आयुष्याचा "कैलासा" अजूनही लांबच आहे..
-----------------------------
रहबर
ईक अजीब सा इत्तेफाक है।
ईक बारिश से बच निकले तो
आगे सैलाबों की आवाज है।
तैर कर पार करना है या
गर्क ए दरीया की आगाज है |
कैसी है ये जज्ब ये कशिश
अरसा ए दहर से मेअराम तक ।
ए मुंतज़िर ए हमनवां ,
मुहाज में तुम हो रहबर
बन जा सफिना मेरा तसव्वूफ तक ।
(C) प्रशांत पेडणेकर
------++++++------+++++++
Meanings of some words.
गर्क ए दरीया - डूब जाना
अरसा ए दहर - दुनिया का मैदान
मेअराम - सर्वोच्च स्थान
मुहाज - युद्ध
रहबर - मार्गदर्शक
सफिना - नाव , नौका
तसव्वूफ - अध्यात्म

Thursday, September 16, 2021

 *मुळसंकल्प ते सिद्धीचा विनायक*

एका लहान मुलाने गणपतीला विचारले " सर्वच जर विधिलिखित असेल तर बाप्पा मी तुला मी काय मागू ? "
गणपती बाप्पा म्हणाला " तुला काय तुझे विधिलिखित ठाउक ? कदाचित तुझ्या भविष्यात काही पान मी कोरी ठेवली असतील व त्यावर मी तथास्तू , इच्छापूर्ती व स्वप्नपूर्ती अशा शब्दानी लिहुन ठेवली असतील व त्या पानांवर तुझे सर्व संकल्प सिद्धीस जाणार असतील. सर्व स्वप्ने पुर्ण होणार असतील.
आणि तुझ्या संकल्पाना साकार करण्यासाठी मी सिद्धिविनायक असेन "...
कदाचित प्रत्येक गणपती , प्रत्येक वेद , प्रत्येक संत आपल्यातल्या भांबावलेल्या लहान मुलाला हेच कानीकपाळी सांगतील ....
"तु जागा हो आणि आधी सुरवात तर कर मी आहे ना तुला तथास्तू म्हणुन जिंकवायला"
संत ज्ञानेश्वरानी सांगितले
"ओम नमो जी आद्या ।वेदप्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा।।"
आद्य ओंकारस्वरुपी आत्मरुपी असणारा गणेश हा स्वसंवेद्य म्हणजे स्वतःच्या स्वतःच, योग्य तसाच, संपूर्णपणे देखील जाणला जावा असा आहे आणि मी स्वत:स सांगत नाही संकल्प करत नाही तोपर्यंत सर्व व्यर्थ आहे.
संत नामदेवजी सांगतात
''ओम नमो जी गणनायेका।सर्वसिध्दिफळदायेका ।
अज्ञानभ्रांति छेदका ।बोधरूपा ।। ''
गणपती हा मागतील त्याची सर्व सिध्दि करणारा व फळदायक आहेत . पण त्यासाठी पहील्यांदा अज्ञानातून तू बाहेर तर पड ! ....
संत रामदासानी तर गणेशाला सुखकर्ता व दु:खहर्ता म्हणजे आयुष्यात सकारात्मकता आणून सुख देणारा व नकाराकत्मतेला हरवून दैन्य दु:ख घालवणारा म्हटलय.
गुरु नारदांनी नारदपुराणात सांगीतल आहे.
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये
म्हणजे आयूष्यातील कोणतेही काम पुर्ण करायचे असेल स्वत:मधील गणपतीला सांग कि काय व कसे काम करायचे.
आपल्या मेंदूचा खालून पाहील्यावर दिसणारा भाग हा गणपतीच्या डोळे व सोंडेसारखाच आहे. श्री टोनी नाडर या लेखकाने ह्युमन फिजीओलोजी : एक्स्प्रेशन आफ वेद ॲन्ड द वेदिक लिट्रेचर या पुस्तकांत ही बाब नमूद केली आहे. त्यामूळे हा सिद्धी गणेश बाहेर नाही तर तुमच्या मनातच आहे असे वाटते.
त्यामूळेच तुकारामानी
मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली,मने इच्छा पुरविली, मन माउली सकळाची
असे म्हणले असेल व इच्छापूर्ती करायला मनालाच सांगीतले असेल.
अथर्वशीर्षात तर सांगीतलय कि
अहं मुलाधारस्थितोसी नित्यम्
म्हणजे मी तुझ्या श शरीरातील कुंडलीनी जागृत करून आयूष्य सुखकर करणा-या सात चक्रापैकी मुलाधार चक्राच्या ठिकाणी वास करतो . मुलाधार म्हणजे मुळस्थानी असलेला आधार म्हणजे पाया, म्हणजेच आपल्या शरीरातील अंतर्मन, जर पाया दणकट व सकारात्मक असेल तर कशाची चिंता करायची नाही. कारण या ठिकाणीच चिंतामणी गणेश म्हणजे सर्व इच्छा अपेक्षांचे पुर्णत्व करणारी देवता आहे .
मूलाधार चंक्र जागृत करण्यासाठी लं (Lam) हा मंत्र आहे ,प्राणायाम केल्यानंतर हा मंत्र १५ मिनीटे म्हणतात. याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे आपले अचेतन मन (Subconscious mind) जागृत करून पुढील आयूष्याचा मार्ग (प्रारब्ध) ठरवत असतो. आपल्या व्यक्तीमत्वाचा. पाया किंवा आधार हे मुलाधार चक्र ठरवते व याठीकाणी विनायक /गणेश असतो.
हे चक्र सकारात्मकतेने परीपुर्ण आहे , स्फूर्ति , उत्साह व विकास हे याचे फायदे आहेत .
लाल रंगाने दर्शवलेले मुलाधार चक्र कमळाच्या चार पाकळ्यानी संकेत देत असते कि उर्जा , गती , जागृती व विकास हे गणेशाच्या मुलाधार चक्राची अंगे आहेत..
जर तुम्हाला इच्छापूर्ती, स्वप्नपूर्ती हवीय तर पहील्यांदा श्री गणेशा करा आपल्यातील बु्द्धीला सांगा कि तुच आहे तुझ्या जिवनाचा शिल्पकार
तुझ्यातील गणपतीच तुला सिद्धीविनायक करणार आहे . सर्व संकल्प सिद्धीस नेणार आहे तथास्तू म्हणणार
गणपती बाप्पा मोरया !!!!
प्रशांत पेडणेकर
हा लेख नावासहीत पाठवायला हरकत नाही ..
Uploading: 743424 of 1316992 bytes uploaded.

Uploading: 371712 of 1051127 bytes uploaded.





Saturday, July 9, 2016

Plastic Misuse

I know you all care for environment. BUT  Have you counted your PLASTIC FOOTPRINT?. Just have a look at below statistics and my assumption of typical Indian plastic use.
1 Toothbrush 1per 3 months
2 Milk bag 2 nos/day
3 Bread Bag 1 per day.
4 Grossary bags 30 per month
5 vegetable bags 1 per day.
6 chocolate /toffee wrappers  30 per month.
7 water bottles 30 per month.
8 disposable cup 15 per month
9 Pens 1 per two months.
10 Medicine , shampoo, hair oil , moisturizer, toothpaste, creams  bottles 1 per month
11 wrappers of all merchandise purchased 15 per month .
12 hotel parcels container.
Please note these are regularly used household items,many household plastic  items which disposed in a year are not counted in the list.

I hope our future generations should not blame us if we all shall take one step to make less plastic environment now.

Do share to others . Do share if you have any best practice.

http://time.com/4186250/ocean-plastic-fish/?xid=time_socialflow_twitter

Rituals of HOLI Festival

Holi

You asked me about why this HOLI in March ?
why do you burn these stems and shrubs ?
and running around it, shouting loud talk ?

O friend! It's my tradition to combust egos, anger, stubborn hartedness unseen under my soft and shining bark.

Let me burn my disbeliefs , wounds, smirk ,
lurk , sulk mask and mark

Let me shout to remind my sole that I am the pure remain
of gold after the burning the dark.

Cos I know there is a new season of spring
with a fresh foliage of obedient ark

Which is a beginning within of a Phoenix spark
(C) Prashant Pednekar
March 2016.