देव ज्याचा त्याचा..
१. पहीली ती म्हणाली मला माझ्या रंगाढंगाचा देव पाहीजे.
सुंदर माधव मेघ श्याम राम घे
वृंदावनीचा तु कृष्ण काळा तू घे
निळ्या रंगाचा शंखचक्रगदाहस्त वाला विष्णू घे.
आणखी वेगळा हवाय तर
जटाधारी निलकंठी शिव तू घे.
२.
दुसरा तो म्हणाला मला प्राणिमात्रांसारखा देव हवाय.
हरीहर म्हणाला ठिक आहे .
उग्रंविर ज्वलंत सर्वमुखं सिंहासारखा महाविष्णू श्री नृसिंह घे.
कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारा, शक्तीशाली व बुद्धी मतांत वरीष्ठ वानरमुखी हणूंमत घे.
बुद्धी असलेला व महाभारत लिहीणारा गजाचे आनन (मुख) असलेला गणेश तू घे.
वराह रुप, मत्सरूप, घे
मधमाशीच्या रुपातील भ्रामरी माता घे.
प्रत्यंगीरा,वाराही , बगलामुखी, मातंगी , कामधेनू अरण्यणी यापैकी ही घे .
३.
ते म्हणाले आम्ही तर तोही नाही व तीही नाही आमच काय.
हरीहर म्हणाला
तुमच्या साठी मी मोहीनी झालो, अर्धनारीनटेश्वर झालो, मी बहूचरा देवी मी अरावन रुपी आहे. मी रेणुका व यल्लमा आहे.
५
ती म्हणाली मला माझ्यासारखी शांत अभ्यासू देवी हवीए
हरीहर म्हणाला ठिक आहे तु सरस्वती पुजन कर.
६
मला तांत्रिक स्रीरूपी हवीए - तू कामाख्या,कामाक्षी कर.
मला उग्र, मर्दीनी हवीए - तु दुर्गा, चंडीका,कात्यायनी घे
मला आर्थिक उन्नती साठी हवीए - तु महालक्ष्मी, कुबेर घे
मला तामसीक हवीए - तारा, चंडीका , चामुंडी, कालभैरव, रूद्र घे.
७
तो म्हणाला तू माझं ऐकणारा पाहीजेस
हरीहर म्हणाला ठिक आहे मी विठ्ठल बनतो तुझं ऐकून विटेवर उभा रहातो
८
ती म्हणाली तु पाण्यासारखा हवायस.
हरीहर म्हणाला ठिक आहे मी गंगाजी, मी यमुनाजी मी कृष्णा, नर्मदा , गोदावरी.
मग पुजशील ना मला माझ्या तीरी मंदीरी.?
९
तो म्हणाला तु हवास माझ्या गावाच्या दारी .
हरीहर म्हणाला ठिक आहे मी राहीन शक्तीरुपि शिवाई, तुकाई,बोल्हाई, धानाई,जाखाई, शिरकाई , चौराई मोहटाई,काळुबाई
मीच राहीन शिव रूपि घृष्णेश्वर, मार्लेश्वर, हाटकेश्वर, दुर्गेश्वर, पुण्येश्वर
१०
तो म्हणाला मला तुझी भक्ती करावी वाटते पण कशी करू
हरिहर म्हणाला तु मला श्रवण कर माझे कीर्तन कर, माझे नामस्मरण, पादसेवन , चरणस्पर्श कर,पुजा अर्चन करण मला वंदन करणे, माझा दास्यत्व घे , माझा मित्र बनून बोल आणि आत्मनिवेदन म्हणजे मीच तु आहेस असं समज.
११
ती म्हणाला मी नास्तिक आहे.
फक्त निर्मीकाला मानते.
हरीहर म्हणाला
ठिक आहे काही हरकत नाही त्याला मान.
पण लक्षात ठेव अब्राहीमीक आणि अब्राम्हणी चां प्रेषितांचा प्रेषीत चा ब्रम्ह.
मीच आहे तो निसर्ग बनवणार नियंता .
११
आणि लक्षात घे
मीच हरी मीच हर
मी द्वैत आहे मीच अद्वैत आहे.
मीच सगुण निर्गुण साकार निराकार आहे. मीच सर्वत्र, सर्वाकार आहे.
जळी स्थळी काष्ठी पाषाणि सर्वत्र मीच ...
मीच तुझे चैतन्य, मीच तुझा गुरू
मीच बाप, मीच सखा
मीच मित्र मीच मुलगा.
१२
माझ्यासाठी तो रामदास म्हणाला जैसा भाव तैसा देव
तो तुकाराम म्हणाला |जया चित्ती जया भाव| त्या जवळी तैसा देव |
तो कबीर म्हणाला मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सो तेरा। तेरा तुझको सौंपता, क्या लागे है मेरा॥.
१३
You don't have to define me. I am there and not there . I am one and many, I am everywhere and in every form. I am the one who is with you as energy, mentor , friend, companion, child.
You manifest me as your god..
प्रशांत पेडणेकर. दिपावली २०२५.
No comments:
Post a Comment