Friday, October 31, 2025

 मन के मते न चलिये, मन के मते अनेक

जो मन पर असवार है, सो साधु कोई एक ।।
संत कबीर
आपल्या मेंदूत सतत वाहणाऱ्या विचारांचा एक गोंधळाचा मेळावा चाललेला असतो. अर्धवट कामे ,‌ राजकारण, खेळ एखादी जाहीरात , आपण कोणाला वाईट बोलल्यावर त्याची आठवण, भविष्यात काय होईल याची काळजी व खेद, भूतकाळातल्या घटना आणि त्यांचं विश्लेषण, इतरांनी बोलण्यामुळे नकोसे वाटणे, अपयशाची भीती, तुलना, अपेक्षा, आणि स्वतःबद्दलचे शंका. अशा अनेक विचारांनी‌ मन एखाद्या गर्दीच्या बाजारासारखं होतं — प्रत्येक दुकानातून (विचारातून) आवाज येतो, कोणी ओढतं, कोणी बोलावतं. परिणाम काय? मनात सतत गोंगाट चालू असतो, आणि लक्ष केंद्रित करणं किंवा योग्य निर्णय घेणं अवघड होतं.
गोंधळलेलं मन सतत ‘करायचं आहे, बघायचं आहे, आठवायचं आहे’ अशा यादीत अडकून राहतं. ही मानसिक गर्दी तणाव, बेचैनी, आणि थकवा निर्माण करते. यात आपण वर्तमान क्षणाचा आनंद हरवतो, कारण आपलं लक्ष भूतकाळाच्या धुक्यात किंवा भविष्याच्या धावपळीत अडकलेलं असतं.
याच्या उलट सजगता (Mindfulness) ही जणू या बाजारात शांतपणे एका कोपऱ्यात बसून, फक्त जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना (विचारांना) बघणं आहे — त्यात अडकून न पडता, फक्त निरीक्षण करणं. यामुळे मन मोकळं होतं, विचार स्वच्छ होतात, आणि आपण हलके, प्रसन्न वाटतो.
कबीर जी‌ म्हणतात जो स्वतःच्या मनावर राज्य करतो‌ त्यासारख्या बलवान कोणी नाही.
वीस मिनिटाचे एक मेडिटेशन आहे त्यातील संगीताच्या लयीनुसार श्वासावर नियंत्रण ठेवलं तर रोज थोड्या प्रमाणात सजगतेकडे (mindfulness) वाटचाल होउ शकते.
लींक

https://youtu.be/pJGVbg0KVhY?si=RIPgOKYcJnukQgI6


Sunday, October 12, 2025

 मनाचे श्लोक या चित्रपटाचे नाव बदलून पुन्हा नव्या नावाने चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतलाय.‌ या आधी हिंदू जनजागृती समितीने या चित्रपटाविषयी केलेली‌ याचीका माननीय कोर्टाने फेटाळून लावली होती.

पण आता जर निर्माता नाव बदलत असेल तर त्याचा हृया चित्रपटाबाबत व्यावसायिक दृष्टिकोन आहे कि लोकांच्या भावनेचा आदर आहे हे समजून घेतले पाहिजे.‌
समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेले " मनाचे श्लोक" हे स्टिव्हन कव्हे यांच्या सेवन हॅबिट ऑफ हायली इफेक्टीव पिपल हे पुस्तक किंवा, द हॅबिट हे पुस्तक व स्टोईझम यांच्या तोडीचे विचार आहेत. सकाळी उठल्यावर सकारात्मकता निर्माण करण्यासाठी हे श्लोक आहेत.
मनाचे श्लोक मधे काय लिहिले आहे..
पुढे वैखरी राम आधि स्मरावा.
परा पश्चंची मध्यमा आणि वैखरी या मनाच्या चार अवस्था आहेत यातील वैखरीच्या आधीची म्हणजे सबकाॅन्शस व काॅन्शसनेस यावेळ्या अवस्थेत म्हणजे दुसरे कोणतेही विचार व विकार मनात येण्यापूर्वी सकारात्मकता निर्माण व्हावी हे सांगितले आहे.
बर‌ं सिग्मंड फ्राईड हा मानस शास्त्रज्ञ हिच सबकाॅन्शस व काॅन्शसनेस माईंड ची गोष्ट १८ व्या शतकात सांगतो.
विनोबा भावे यांच्या मते, ‘मनाचे श्लोक’ ही रामदासांची अपौरुषेय वाणी आहे.ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजा महाराज म्हणतात, ‘’सामान्य माणसानेमोठमोठाले ग्रंथ वाचण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांनी मनाचे श्लोक पाठ करावेत व त्यात सांगितल्याप्रमाणे साधन करावे. त्यांना खात्रीने भगवंताचे दर्शन होईल.”
हि झाली वस्तुस्थिती.‌ पण १६ व्या शतकातील समर्थ रामदासाचे विचार निर्माता , न्यायाधीश, कायदे यांच्यापुढे कुचकामी ठरतात.‌ कारण गेल्या काही वर्षांतील घडत असलेल्या घटना पाहील्या की हे फक्त ईतर धर्मासाठी आहे आणि बहूसंख्य हिंदू लोकांसाठी नाही. असे वाटते ..
संविधानाच्या चौकटीत राहून विचार केला तर संविधानचे कलम २५ स्वतःच्या धर्माबद्दल आदर ठेवणं, त्याचा अंगिकार करणे हे सांगितले आहे. पण त्याचबरोबर दुसऱ्या धर्मातील लोकांना तुमच्या वागण्यामुळे त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे हे संविधान सांगितले आणि असे चुकीचे झाले तर राज्यसंस्था योग्य ती कारवाई करू शकते.‌
नृपूर शर्मा प्रकरणातील काही लोकांची भुमिका व प्रेषितांचा प्रेषित भगवान विष्णू बद्दल टिप्पणी, किंवा समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोक या बद्दल ची भुमिका पाहीली तर हिंदू देवतांची, ग्रंथाची बदनामी याबद्दल राज्यव्यवस्था कायम उदासीन राहीली आहे. धर्मनिरपेक्षता या नावाखाली बहूसंख्य लोकांच्या आस्था, प्रतीके, संस्कृती यावर बिनधास्त टिप्पणी करणे चालू असते.‌
जर एखाद्या या आस्थेबद्दल कोणी बोलला तर लगेच वामपंथी याला मनूवादी लेबल लाऊन टाकतात..
पण तत्पूर्वी ते बोलणारे महत्वाची गोष्ट लक्षात घेत नाहीत कि प्रत्येक हिंदू हा मनापासून जाणतो कि मनूस्मृतीची जागा भिमस्मृती ने‌ म्हणजे संविधानाने घेतली आहे.‌भिमस्मृती हि आजच्या काळातील आहे स्वातंत्र्य, समता , व एकमेकांबद्दल आदर देणारी आहे. स
स्वर्गीय वाजपेयी यांच्या विचारानुसार देश हा मनूस्मृती वर नाही तर भिमस्मृतीवर चालतो.‌
परंतु हे सर्व वामपंथी, तथाकथित पुरोगामी मानतात का? प्रत्येक बाबतीत ते ट्विट व कलूषित भाषणातून हिंदू धर्माबद्दल द्वैष मनूस्मृती, मनूवादी अशा शब्दांत पाजळत असतात.‌ बहूसंख्य हिंदू बद्दल हा तिटकारा का ?
अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मनूस्मृती हि सगळीच चांगली होती असं नाही कालानुरूप ती गरजेची होती. नंतर ती. कालबाह्य झाली व त्यातील काही गोष्टितर त्याज्य झाल्या. म्हणून " सर्व ही तपसा साध्यम् " असा‌ कार्यरत रहाणाऱ्याचा संदेश देणारे मनू ऋषी सगळेच चुकीचे होते व मनूवादी मनूवादी म्हणून लोकांची हेटाळणी करणे चुकीचे आहे. त्याकाळी तत्कालीन राज्यसंस्थेसाठी ती अनूरूप होती.‌
तसेच भिमस्मृती हि देशासाठी आजच्या गरजेनुसार आमूलाग्र विचारप्रवर्तक आहे. ती वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित ठेउन सार्वभोमत्व, न्याय , समानता, प्रजासत्ताक , लोकशाही या तत्वाचा वापर करते.‌
भिमस्मृती कोणत्याही धर्माच्या साठी नाही.‌‌ ती सर्व धर्म पंथासाठी आहे. तीचा सन्मान करणे प्रत्येक व्यक्तीला कितीही मोठ् सर्वोच्च पदावर असली‌ तरी मान्य केलेच पाहीजे.
वैयक्तीक आयुष्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या २१ प्रार्थनेत पैकी पहीली प्रार्थना " मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही " किंवा हे तत्व श्रद्धा म्हणून स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात व वैयक्तिक धर्मासाठी पाळताना कोणालाही हरकत असायचे कारण नाही.
माझाच देव सर्वात मोठा हे स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात व वैयक्तिक धर्मासाठी पाळताना कोणालाही हरकत असायचे कारण नाही.
पण भगवान‌ विष्णू जो हिंदू धर्मासाठी पालनकर्ता आहे. त्याबद्दल बोलताना सर्वांनी‌ जागरूक राहीले पाहीजे. कोणत्याही ईतर धर्माचे पालन करणारे व कोणत्याही छोट्या किंवा सर्वोच्च पदावरील व्यक्तीने संविधानाच्या २५ व्या कलमाला पण पाळलेच पाहिजे.‌ तेही वैयक्तिक श्रद्धेला बाजूला ठेवून..
अन्यथा तो‌ भिमस्मृतीचा (संविधानाचा ) देखील अपमान आहे.
हे देखिल वामपंथी व तथाकथित पुरोगामी लोकांनी मान्य केले पाहिजे.कि हिंदूचे शांततामय सहजीवन म्हणजे बुळगेपणा नव्हे. तर भिमस्मृतीतील तत्वाचा अवलंब करून जगणे आहे.‌
आणि हिंदू धर्मातील लोकांनी यापुढे अशा गोष्टी टाळायची असेल तर त्यांच्या नवा अट्रोसिटी कायदा आणण्याची गरज आहे ज्यामध्ये हिंदू देवदेवतांची , धार्मिक पुस्तकांची श्लोकांची. बदना

Thursday, October 2, 2025

 मन दर्पण _ Perception

जब हम पहेले मिले, तो मैंने छवि बनाई,|
मन के दर्पण में थी तेरी प्रतिमा सजाई।
मेरे विचारों का वह मधुर, निर्मल या खुंखार प्रतिरूप,
उसे संवारा, सँजोया,या बोया मैंने रखा सदा अनूप।
दिन गुजरे, बदला समय, बदले सब रंग,
तुम भी बदल चले नए किसी रूप के संग।
पर मैं था अटका उसी तुम्हारे चित्र में,
दर्पणके मेरे मन के बंधन की उस लिपि में।
सच में यदि बदलते हूए तुम्हें समझना है,
उस दर्पणके छवि को पहले मिटाना है।
बदलना, मरोडना, मारना या उच्छेदना है |
सवंरना, उभरना, गरीमामय उन्नत बनाना है
अपने ही अंतर्मन का दर्पण करे चिंतन |
न समझ सके उस मायावी छवि का विवरण |
प्रशांत पेडणेकर
२ ऑक्टोबर २०२५

 देव ज्याचा त्याचा..

१. पहीली ती म्हणाली मला माझ्या रंगाढंगाचा देव पाहीजे.
हरीहर म्हणाला . ठिक आहे
सुंदर माधव मेघ श्याम राम घे
वृंदावनीचा तु कृष्ण काळा तू घे
निळ्या रंगाचा शंखचक्रगदाहस्त वाला विष्णू घे.
आणखी वेगळा हवाय तर
जटाधारी निलकंठी शिव तू घे.
२.
दुसरा तो म्हणाला मला प्राणिमात्रांसारखा देव हवाय.‌
हरीहर म्हणाला ठिक आहे .
उग्रंविर ज्वलंत सर्वमुखं सिंहासारखा महाविष्णू श्री नृसिंह घे.
कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारा, शक्तीशाली व बुद्धी मतांत वरीष्ठ वानरमुखी हणूंमत घे.
बुद्धी असलेला व महाभारत लिहीणारा गजाचे आनन (मुख) असलेला गणेश तू घे.
वराह रुप, मत्सरूप, घे
मधमाशीच्या रुपातील भ्रामरी माता घे.
प्रत्यंगीरा,वाराही , बगलामुखी, मातंगी , कामधेनू अरण्यणी यापैकी ही घे .
३.
ते म्हणाले आम्ही तर तोही नाही व तीही नाही आमच काय.
हरीहर म्हणाला
तुमच्या साठी मी मोहीनी झालो, अर्धनारीनटेश्वर झालो, मी बहूचरा देवी मी अरावन रुपी आहे. मी रेणुका व यल्लमा आहे.
ती म्हणाली मला माझ्यासारखी शांत अभ्यासू देवी हवीए
हरीहर म्हणाला ठिक आहे तु सरस्वती पुजन कर.
मला तांत्रिक स्रीरूपी हवीए - तू कामाख्या,कामाक्षी कर.
मला उग्र, मर्दीनी हवीए - तु दुर्गा, चंडीका,कात्यायनी घे
मला आर्थिक उन्नती साठी हवीए - तु महालक्ष्मी, कुबेर घे
मला तामसीक हवीए - तारा, चंडीका , चामुंडी, कालभैरव, रूद्र घे.
तो म्हणाला तू माझं ऐकणारा पाहीजेस
हरीहर म्हणाला ठिक‌ आहे मी विठ्ठल बनतो तुझं ऐकून विटेवर उभा रहातो
ती म्हणाली तु पाण्यासारखा हवायस.
हरीहर म्हणाला ठिक आहे मी गंगाजी, मी यमुनाजी मी कृष्णा, नर्मदा , गोदावरी.
मग पुजशील ना मला माझ्या तीरी मंदीरी.?
तो म्हणाला तु हवास माझ्या गावाच्या दारी .
हरीहर म्हणाला ठिक आहे मी राहीन शक्तीरुपि शिवाई, तुकाई,बोल्हाई, धानाई,जाखाई, शिरकाई , चौराई मोहटाई,‌काळुबाई
मीच राहीन शिव रूपि घृष्णेश्वर, मार्लेश्वर, हाटकेश्वर, दुर्गेश्वर, पुण्येश्वर
१०
तो म्हणाला मला तुझी भक्ती करावी वाटते पण कशी करू
हरिहर म्हणाला तु मला श्रवण कर माझे कीर्तन कर‌, माझे नामस्मरण, पादसेवन , चरणस्पर्श कर,पुजा अर्चन करण मला वंदन करणे, माझा दास्यत्व घे , माझा मित्र बनून बोल आणि आत्मनिवेदन म्हणजे मीच तु आहेस असं समज.
११
ती म्हणाला मी नास्तिक आहे.
फक्त निर्मीकाला मानते.
हरीहर म्हणाला
ठिक आहे काही हरकत नाही त्याला मान.
पण लक्षात ठेव अब्राहीमीक आणि अब्राम्हणी चां प्रेषितांचा प्रेषीत चा ब्रम्ह.
मीच आहे तो निसर्ग बनवणार नियंता .
११
आणि लक्षात घे
मीच हरी मीच हर
मी द्वैत आहे मीच अद्वैत आहे.
मीच सगुण निर्गुण साकार निराकार आहे. मीच सर्वत्र, सर्वाकार आहे.
जळी स्थळी काष्ठी पाषाणि सर्वत्र मीच ...
मीच तुझे चैतन्य, मीच तुझा गुरू
मीच बाप, मीच सखा
मीच मित्र मीच मुलगा.
१२
माझ्यासाठी तो रामदास म्हणाला जैसा भाव तैसा देव
तो तुकाराम म्हणाला |जया चित्ती जया भाव| त्या जवळी तैसा देव |
तो कबीर म्हणाला मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सो तेरा। तेरा तुझको सौंपता, क्या लागे है मेरा॥.
१३
You don't have to define me. I am there and not there . I am one and many, I am everywhere and in every form. I am the one who is with you as energy, mentor , friend, companion, child.
You manifest me as your god..
प्रशांत पेडणेकर. दिपावली २०२५.

Thursday, September 18, 2025

 माझं अस्तित्व, माझं जगणं , माझं जगणं, माझा आनंद, माझी वर्तणूक ही माझी माझी माझी नाहीये..

आई, बाप, आजी ,आजोबा, दादा, दादी, नाना, नानी, पणजोबा,खापर पणजोबा, खापर खापर पणजोबा या सगळ्यांनी स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि मानव वंश पुढे नेण्यासाठी केलेल्या कष्टाचे, झगडण्याचे , त्यानी केलेल्या वर्तणूकीच्या मापदंडांचे म्हणजेच परंपरेचे. स्थलांतरित भटके पणापासून स्थिर कृषी संस्कृतीचे प्रतीक आहे.. त्यांनी परीस्थितीचा अभ्यास करून निसर्गाशी जुळवून घेत विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवून मार्गक्रमण केली. विविध संशोधने केली‌
तुमचं अमुक पद्धतीने बोलणे , तुमचं स्थानांतरीत , स्थलांतरित होणे हे कुठेतरी तुमच्या पुर्वजांमूळे झालंय
फक्त गेल्या १० पिढ्यांचा विचार केला तरी आई बाबांच्या कुटूंबातील ४०९६ पितरांनी तुमच्या अस्तित्वात येण्यापूर्वी खस्ता खाल्ल्या आहेत. कित्येक रुपात कित्येक नावांनी ते इथे पृथ्वीवर आले. त्यांच्या आकांक्षा , ईच्छा व सदिच्छा तुमच्या सोबत आहेत..
गंमतीशीर बाब म्हणजे यातील एक जरी दुवा पुर, दुष्काळ, युद्ध , आक्रमणे आणि साथीचे आजार त्यामुळे तुटून पडला असता म्हणजे एक आई बाबा नसते तर पुढचा वंश वाढला नसता आणि आज तुम्ही हि पोस्ट वाचू शकला नसता...
त्यासाठी कृतज्ञ रहाणं तुमचं कर्तव्य नाही का?
त्यांचं ऋण फेडण्यासाठी कृतज्ञता दाखवण्यासाठी अर्धा दिवस सुट्टी काढून दहि भाताची काकवळ ठेवत असाल तर सकारात्मक मन व जिंकावे कसे. (Positive mindset and how to win. ) या तुमच्या आवडत्या विषयावरील विविध भाषेतील हजारो पुस्तकातील महत्वाचा असा ग्रटिट्यूट /. कृतज्ञता हे प्रकरण तुम्ही मनापासून करताय व आणि भारतीय पद्धतीने त्याची अंमलबजावणी करताय. हे सिद्ध होते..
अणि लक्षात ठेवा मोज्यात देव वस्तू ठेवतो , संत कमीत कमी ३/५ चमत्कार करतो एका दिशेने प्रार्थना करून देवापर्यंत पोहोचतो हे खरं असेल तर कावळा , गाय इत्यादी प्राण्यांच्या पोट भरण्याने, त्यांनी दिलेल्या तृप्तीचा ढेकर पुर्वजांच्या प्रती आपली कृतज्ञतेची भावना पुर्ण होत असेल तर त्यालाही श्रद्धा म्हणायला हवी ना ?
पितृपक्षात पितर पृथ्वीवर येतात व दिवाळीच्या रोषणाईच्या प्रकाशात परत जातात असे म्हणतात.

Sunday, July 27, 2025

 TK आणि GI उल्लंघनाविरोधात कोल्हापुरी चप्पलसंदर्भात निषेध – ट्रेंडमध्ये

अलीकडे इटलीमधल्या मिलान शहरात एक फॅशन शो झाला. तिथे एका मोठ्या फॅशन ब्रँडने कोल्हापुरी चप्पल वापरली, जी भारताची पारंपरिक ओळख आहे. पण त्यांनी या चप्पलचं योग्य नाव घेतलं नाही, म्हणजे भारताला किंवा कोल्हापुराला क्रेडिट दिलं नाही. त्यामुळे अनेक भारतीय लोक नाराज झाले आहेत.
इंस्टाग्रामवर लोक याविरोधात पोस्ट टाकत आहेत. अशा पोस्ट २०,००० पेक्षा जास्त लोकांनी शेअर केल्या आहेत. लोकांचं म्हणणं आहे की कोल्हापुरी चप्पल ही आपल्या परंपरेचा भाग आहे आणि तिचा आदर केला पाहिजे.
ही गोष्ट ESG नावाच्या मूल्यांशी जोडलेली आहे.
ESG म्हणजे Environmental, Social आणि Governance (पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासनविषयक मूल्यं).
या अंतर्गत खालील गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात:
• पर्यावरणाची काळजी घेणं
• समाजात न्याय आणि समानता राखणं
• पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन
ESG च्या "Social" भागात परंपरा, संस्कृती आणि स्थानिक ज्ञानाचं रक्षण करणं येतं.
२०१९ साली कोल्हापुरी चप्पलला GI टॅग मिळाला होता.
GI म्हणजे Geographical Indication (भौगोलिक निर्देशांक) – म्हणजे विशिष्ट भागात तयार होणाऱ्या खास वस्तूंसाठी मिळणारा ओळख टॅग.
यामुळे त्या वस्तूची खास ओळख आणि गुणवत्ता सिद्ध होते. पण त्या फॅशन ब्रँडने हे नियम पाळले नाहीत आणि कोल्हापुरी चप्पलचं योग्य नाव घेतलं नाही.
कोल्हापूर हे महाराष्ट्रातलं एक सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इथल्या लोकांनी ६,००० पोलिश लोकांना मदत केली होती. त्यामुळे इथल्या लोकांना आपल्या परंपरेचा खूप अभिमान आहे. म्हणूनच त्यांच्या बनवलेल्या चप्पलचं योग्य नाव न घेतल्यामुळे त्यांना वाईट वाटतंय.
ही घटना आपल्याला आठवण करून देते की पारंपरिक ज्ञानाचा (TK – Traditional Knowledge) सन्मान करणं गरजेचं आहे.
TK म्हणजे आपल्या आजी-आजोबांकडून आलेली पारंपरिक माहिती, पद्धती, कौशल्यं, चिन्हं आणि सांस्कृतिक वारसा.
WIPO (World Intellectual Property Organization) ही आंतरराष्ट्रीय संस्था TK आणि GI साठी नियम बनवते.
आशा आहे की त्या फॅशन ब्रँडला कोल्हापुरी चप्पलच्या GI टॅगचं आणि भारताच्या परंपरेचं महत्त्व समजेल, आणि ते भविष्यात योग्य आदर दाखवतील.

Friday, July 4, 2025

 तुमच्या वर कोण राज्य करते यावर तुमची बोली भाषा अवलंबून असते. उदा लॅटिन अमेरिकावर स्पॅनीश, पोर्तुगीजचा व भारतावर इंग्रजीचा प्रभाव आहे. पण त्यापुर्वी भारतावर प्रभाव होता तो खडी हिंदी भाषेचा. फारसी मिश्रित हिंदीने देवनागरी लिपी घेतली व स्थानिक भाषा घेतल्या त्यावेळी मराठ्यांच्या उत्तर भारतातील प्रभावामुळे लष्करी व कामकाजात मराठी व संस्कृत मिश्रित खडी हिंदीचा समावेश झाला. छत्रपतींच्या नेतृत्वाखाली बहुतांश मराठी शासक सरदार असल्याने (पेशवे, शिंदे, होळकर, गायकवाड ) मराठी युक्त हिंदी राज्य करायला मराठी सरदारांना सोपी झाली. त्यामुळे हिंदी बोलणे सर्वात सोपे कोणाला जात असेल तर मराठी माणसाला.

एकेकाळी मराठ्यांच्या मुळेच जास्त प्रचलीत झालेली हिंदी भाषा आता मराठी माणसाला कशी त्रासदायक होईल. आपल्या पेक्षा कितीतरी छोटी संख्येने लोक बोलत असलेली फ्रेंच, जर्मन, इटालीयन, स्विडीश भाषा टिकुन आहेत.कारण या भाषेतील लोक ज्ञानाधिष्ठित आस्थापनांच्या (कंपन्यांच्या) मार्फत जगावर राज्य करतात. भाषिक आक्रमणाची भिती न बाळगता आपल्या भाषेत अधिक अधिक ज्ञान निर्माण करणे व ज्ञानाधिष्ठित व्यवसायाने जगावर अधिराज्य गाजवणे हे मराठी व महाराष्ट्रासाठी महत्वाचे आहे.
तुम्ही जोपर्यंत आर्थिक व वैज्ञानिक बाबीत मराठी वापर करीत नाही तोपर्यंत मराठीची वृद्धी कठीण आहे लिंक्डइन सारख्या प्रोफेशनल सोशल मिडियावर मराठीत लिखाण करणारे १० लोक पण नाहीत यात मराठी माणसाचा कमीपणा नाही का? मराठी माणूस मराठी चित्रपट पहायला सिनेमागृहात जात नाही आणि तरीदेखील आशयसंपन्न चित्रपटांची मागणी करतो . हे म्हणजे दुटप्पीपणाचे लक्षण नाही का .
माझ्या पाहण्यातील बहूतांश लघू मध्यम वर्ग व मध्यम मध्यम वर्ग आपल्या मुलांना महागड्या स्थानिक इंग्रजी शाळेत घालतो. जिथे शिक्षक म्हणून कोणत्याही पदवीधारकांना भरले जाते. त्यामुळे मुलांना शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होतो. पण पालक मात्र माझा मुलगा/गी इंग्रजी शाळेत शिकतो म्हणून खुष आणि कर्जात असतात. मराठीचा मुद्दा पुढे करणारे राजकारणीच इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभारण्यात व भरपूर फी घेण्यात पुढे असतात. यामुळे सुंदर जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळा हळुहळू बंद होत आहेत.
त्यामुळे भाषेचा मुद्दा भावनिक न करता, आर्थिक ताकदीचा व व ज्ञानाचा केला पाहीजे. आणखी एक अवलोकन: इंग्रजी किंवा दक्षिण भारतीय चित्रपट तेलगू, तामिळ व कन्नड मधे भाषांतरीत होतात व सिनेमागृहात लागतात. पण मराठी माणूस मात्र याच चित्रपटाची हिंदी आवृत्ती पहायला गर्दी करतो. कितीही मोठा मराठी कलावंत असेल तरीही टिव्हीवर तो हिंदी कलाकारांना अवास्तव आदर देतो व प्रेक्षकही मुंबईत वर्षानूवर्षे रहाणाऱ्या हिंदी कलावंताचे एक तोडकेमाडके मराठी वाक्य ऐकूनही भारावून जातो. आणि टाळ्या वाजवतो. अरे तो महाराष्ट्राचा ईतके वर्ष भाग आहे आणि त्याला/तिला मराठी आले पाहीजे हि साधी अपेक्षा नको का?
मराठी येत असताना हिंदीचा वापर आर्थिक व ज्ञानाधिष्ठित प्रगतीसाठी कसा करता येईल हा विचार क्षणोक्षणी केला तर हिंदीचा राग व द्वेष निघून जाऊन मराठीचा उत्कर्ष व ईतर भाषांबद्दल आदर चालू होईल व मराठी भाषा शिक्षणाचे ईतर भाषिक लोकांसाठी वर्ग (क्लासेस) चालू होतील.
जय मराठी
प्रशांत पेडणेकर.