नुकताच तू भेटलास
त्या गौळणी, भारत नावाच्या घरासाठी अमुल नावाच आणंद दायी दुध गोळा करतात होत्या तेव्हा,.
त्या गौळणी ' कुरीयन' असं काहीतरी
म्हणत होत्या नाव त्यांच्या गोपाळाचं
पण मला माहीताय तो तुच होतास.
परवाच तर तू येउन गेलास
हतबल षंढ अर्जुनांना पृथ्वी , अग्नी अशी
शस्त्र देउन. अथक काम करुन ,
करोडोंना अग्निपंखाचा नवा कर्मयोग सांगून.
सगळेजण एपीजे असं काहीतरी
म्हणत होते त्यांच्या गुरूचं
पण मला माहीताय तो तुच होतास.
त्या आधीही वाचलं होत
तुझ्यासारख्या माणसाबद्दल
त्यानेही सांगीतले होते प्राकृतात
तुच सांगितलेलं
द्न्यानीयां राजा असं काहीतरी
म्हणत होते नाव त्या अमृतानुभवी योगीराजाचं
पण मला माहीताय तो तुच होतास
सगळेच म्हणाले म्हणाले मला
काहीतरीच काय !
हे कस शक्य आहे.
पण मला माहीत्येय
तोच तू होतास
कारण तूच म्हणाला होतास
यदा यदाही धर्मस्य च्या वेळेस
तु येतोस भारतवर्षात
प्रशांत पेडणेकर
गोकुळाष्टमी २०१५.
त्या गौळणी, भारत नावाच्या घरासाठी अमुल नावाच आणंद दायी दुध गोळा करतात होत्या तेव्हा,.
त्या गौळणी ' कुरीयन' असं काहीतरी
म्हणत होत्या नाव त्यांच्या गोपाळाचं
पण मला माहीताय तो तुच होतास.
परवाच तर तू येउन गेलास
हतबल षंढ अर्जुनांना पृथ्वी , अग्नी अशी
शस्त्र देउन. अथक काम करुन ,
करोडोंना अग्निपंखाचा नवा कर्मयोग सांगून.
सगळेजण एपीजे असं काहीतरी
म्हणत होते त्यांच्या गुरूचं
पण मला माहीताय तो तुच होतास.
त्या आधीही वाचलं होत
तुझ्यासारख्या माणसाबद्दल
त्यानेही सांगीतले होते प्राकृतात
तुच सांगितलेलं
द्न्यानीयां राजा असं काहीतरी
म्हणत होते नाव त्या अमृतानुभवी योगीराजाचं
पण मला माहीताय तो तुच होतास
सगळेच म्हणाले म्हणाले मला
काहीतरीच काय !
हे कस शक्य आहे.
पण मला माहीत्येय
तोच तू होतास
कारण तूच म्हणाला होतास
यदा यदाही धर्मस्य च्या वेळेस
तु येतोस भारतवर्षात
प्रशांत पेडणेकर
गोकुळाष्टमी २०१५.