नमस्कार"
"सर, तुम्ही मला पहिल्या फोनवर नमस्कार केला तेव्हा मला खूप बरं वाटलं." ओलाचा ड्रायव्हर जेंव्हा मी गाडीत बसत होतो तेंव्हा म्हणाला,
तो म्हणाला. “सर जेव्हा जेव्हा मी ग्राहकाकडून कॉल करतो किंवा कॉल उचलतो तेव्हा ते इतके स्वतःच्या कोषात आत्ममग्न असतात की तुम्ही कुठे आहात, तुम्हाला उशीर का झाला असेच सर्व काही प्रश्न त्यांना पडतात. कधीकधी ते इतके उद्धट असतात की विचारता सोय नाही.
ड्रायव्हर म्हणून आम्हीही माणूस आहोत आणि आम्हालाही मन, भावना आहेत याचा विचार नसतो , ते गाडीत बसले असले तरी त्यांच्याकडे फक्त आपल्याकडे बघायला स्मितहास्य करायलाही वेळ नसतो.
त्यांना मोबाईल आणि इअरप्लगचे इतके वेड लागलेले आहे की ते कारला अगदी इलेक्ट्रिकल लिफ्टसारखेच मानतात.
कधीतरी विशिष्ट वयोगटातील लोकांकडून असभ्य वर्तन, कारमध्ये धुम्रपान स्वीकारावे लागते.”
मी त्याच्या बोलण्याने सुन्न झालो. "श्रमाच्या प्रतिष्ठे बद्दल आणि इतरांचा आदर करण्याबद्दल लोकांच्या निष्काळजीपणा बद्दल मला खुपचं वाईट वाटले.
असंघटित क्षेत्रातील लोकांशी व्यवहार करताना "कामाची प्रतिष्ठा" याची जाणीव प्रत्येक व्यक्तीला असणे महत्त्वाचे आहे. विशेषत: असंघटित क्षेत्रातील बर्याच नोकऱ्यांना भारतीय खंडाच्या काही भागात नेहमीच "कमी कामाच्या प्रतिष्ठेच्या नोकर्या "मानल्या जातात.
महात्मा गांधींचे सुप्रसिद्ध म्हण आहे, ‘एखाद्याला समजून घेण्यासाठी देण्यासाठी, तो व्यक्ती आपल्या खालच्या लोकांशी कसा वागतो ते पहा’.मगच तुम्हाला कसा आहे ते कळेल.
आपण जोपर्यंत आपल्या मुलांना "कचरेवाला वो नही, कचरेवाले तो हम है वो तो सफाईवाला है" असं सांगून श्रम प्रतिष्ठेबद्दल शिक्षण देऊ शकलो तर योग्य होणार नाही का?
ग्राफिक डिझायनर जेम्स फ्रिडमन @framie013 यांचे एक ट्विट चित्रात देत आहे. त्याला एका व्यक्तीने चित्रातील कचरा उचलणारी व्यक्ती काढायला सांगितली त्यावर त्याने दिलेले उत्तरादाखल चित्र कामाच्या प्रतिष्ठेचे मूल्य जाणूण देणारे आहे.
No comments:
Post a Comment