आठवणीतील गाणे.
कागा सब तन खायो चुन चुन खायो मांस ||
दो नैना मत खायो मोहे पिया का आसियान मिला ||
असा मुळ दोहा आहे पंजाबी संत फरीद यांचा.
देवाच्या भेटीची आस लागून त्यांनी अन्नग्रहण पूर्णपणे कमी केले मुठभर धान्यावर ते जगत होते. त्यामुळे त्यांच्या शरीरावरील पुर्ण मांस जाऊन अशक्त झालेल्या शरीरात फक्त डोळेच हा भाग मांसल राहीला होता , अशावेळी ते कावळ्यांना विनंती करत होते की मला माझ्या प्रिय ईश्वराला भेटायचे आहे म्हणून माझे डोळे तेवढे हिरावून घेऊ नकोस....
आणि हेच शब्द इर्शाद कामील याने या गाण्यात घेतलेत.
कागा रे कागा इतनी अरज मोरी चुनचुन खयीयो मांस. |
खय्यौ ना तू नैना मोरी, पिया की मीलनकी है आस||
हे ऐकलं की या गाण्यातल राॅक पणा जाउन एकदम भारतीयत्व येऊन जात.
मग आठवतं कैलाश खेर , हरदिप कौर यांनी गायलेलं जाना जोगी दे नाल (कागा सब तन खहियो) हे गाणे किंवा
लता मंगेशकर यांनी गायलेलं "पिया मिलन की आस" या चित्रपटातील कागा सब तन खाईयो हे गाणे.
तसेच इतर परदेशी असणाऱ्या प्रियकराला संबोधित किशोर कुमार यांच्या आवाजातील चाचा झिंदाबाद या १९५९ सालच्या चित्रपटातील
देस छुडाये भेस छुडाये | क्या क्या करे ना प्रीत रामा |
क्या क्या करे ना प्रीत | रंग बदल दे, ढंग बदल दे |
प्रीत की ऐसी रीत रामा | प्रीत की ऐसी रीत |
कागा सब तन खाइयो | चुन चुन खाइयो सब मांस
हाँ हाँ हाँ हाँ
ये दो नैना मत खाइयो || ओ मोहे, ओ मोहे , ओ मोहे
पत, पत, नी, नी पत्नी | पत्नी मिलन की आस
अर्थातच किशोरजींचे गाणं थोडं विडंबनात्मक आहे.पण भाव तोच आहे.
एकंदरीत स्वतः ला विसरून भौतिक सुखाच्या वेगवेगळ्या पातळीवर अनुभव घेतल्या नंतर "बास्स झालं सगळं " असा विचार येऊन सन्मार्गावर यायच आणि आपलं आत्मिक सुख कशात आहे याचा ध्यास लागणारे हे गाणं आहे...
चित्रपट कथेत जनार्दन ऊर्फ जाॅर्डन हा मनस्वी गायक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचतो, सर्व ऐशोआराम, सुख, सगळं पायाशी असताना व्यसनाधीनता, पराकोटीचा गर्व या सगळ्या गोष्टी सुरू होतात तेंव्हाच त्याची लाडकी प्रेयसी मरणाच्या दारात पोहोचते तेव्हा त्याला कळतं
" हे जगणं म्हणजे एक नरक आहे""....
कारण तुमची निरागसता , शुद्धता तुम्ही गमावली आहे....
आणि मग चालू होतो रिफ्लेक्शन व पश्चात्तापाचा खेळ आणि जाॅर्डन हे गाणे काॅन्सर्ट मधे म्हणायला लागतो.
स्वतःच्या मनाला नादां परींदे म्हणणे व क्यूँ देस विदेस फिरे मारा म्हणणे आणि शरीरावर व्यसनांनी केलेल्या अत्याचाराबाबत व चुकीच्या गोष्टी साठी
सौ दर्द बदन पे फैलै है
हर करमसे कपडे मैले है
म्हणून पश्चात्तापाच्या अग्नीत स्वतः होरपळून जाणं..
आणि पुन्हा पुन्हा मनाला सन्मार्गावर आणून किमान त्यामुळे तरी आपली प्रिय व्यक्ती मरणाच्या दारातून परत येईल असे स्वतःच्या मनाला आश्वासन देणं.....
असा काहीसा हा गाण्याचा प्रकार आहे..
तुमच्या माहितीसाठी पुन्हा त्याचे बोल खाली देत आहे. तसेच वर नमूद केलेली गाण्याची लिंक पण देत आहे..
पण त्या आधी ए आर रहमान व मोहित चौहान यांना मानाचा मुजरा...
तसेच रणबीर कपूर याने तितक्याच ताकदीने हे गाणं सादर केले म्हणून त्याला हि सलाम...
ओ नादान परिंदे घर आजा
ओ नादान परिंदे घर आजा
ओ नादान परिंदे घर आजा
घर आजा, घर आजा, घर आजा आ आ….
क्यूँ देश-बिदेश फिरे मारा
क्यूँ हाल-बेहाल थका हारा
क्यूँ देश-बिदेश फिरे मारा
तू रात बिरात का बंजारा
ओ नादान परिंदे घर आजा
घर आजा, घर आजा, घर आजा आ आ….
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
सौ दर्द बदन पे फैले है
हर करम के कपडे मेले है
काटे चाहे जितना परों से हवाओं को
खुद से ना बच पायेगा तू
तोड़ आसमानों को
फूँक दे जहानों को
खुद को छुपा ना पायेगा तू
कोई भी ले रास्ता, तू है तू में बस्ता
अपने ही घर आएगा तू
ओ नादान
ओ नादान परिंदे घर आजा
घर आजा, घर आजा, घर आजा आ आ….
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
कागा कागा रे मोरी इतनी अरज तोसे
चुन चुन खाइयो मांस
कागा कागा रे मोरी इतनी अरज तोसे
चुन चुन खाइयो मांस
अरजिया रे खाइयों ना तू नैना मोरे
खाइयों ना तू नैना मोहे
पिया के मिलान की आस
खाइयों ना तू नैना मोरे
खाइयों ना तू नैना मोहे
पिया के मिलान की आस
ओ नादान
ओ नादान परिंदे घर आजा
घर आजा, घर आजा, घर आजा आ आ….
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा
नादान परिंदे घर आजा.
लेख आवडला तर शेअर करायला काही हरकत नाही.
प्रशांत पेडणेकर...
No comments:
Post a Comment