आठवणींचा वाढदिवस.
"देखो तुम भुल गयी ना । आजसे पाच महिने पहले मैने तुम्हे दिल कि बात बतायी थी । " अस म्हणून शँपेनने नायिकेच्या भेटीचे सेलेब्रेशन करणारा " दिल चाहता है " मधला सुबोध आठवतोय. टाईमटेबलसारखं चाकोरीबद्ध आयूष्य असलेला. स्वतःसाठी थोडा स्वप्नील , नॉस्टाल्जिक असणारा सुबोध, ईतरांना मात्र त्याच्या आठवणींच्या सेलेब्रेशन करण्याच्या सवयीमुळे तो स्वमग्नतेच्या पुढच्या पातळीवर किंवा वेगळा वेगळा आहे असं वाटतं.
पण अशा छेट्या छोट्या आठवणीबद्दलची प्रत्येकाला वाटणारी ओढ , नॉस्टाल्जिया खरच किती वेगळा आणि सुंदर अनूभव असतो. ते सोनेरी क्षण किंवा हलकेफुलके सुखदु:खाची उधळण वा आनंदाची पखरण अनेक सुखांपेक्षा अनमोल असते.
आणि तोच स्मरणरंजनाचा क्षण जर दुस-या कोणी दिला तर म्हणजे तुम्ही कोणाला विश केलं आणि समोरची व्यक्ती म्हणाली की " तुम्ही फोन केल्यामुळच कळलं कि आज माझा वाढदिवस आहे. "
किती आनंददायी क्षण असेल तो.
कारण , वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी हे सगळं आपण साजरे करतो तो दिवस म्हणून नाही, तर ती आठवण साजरी करत असतो .या दिवशी आपण जन्माला आलो म्हणून त्या दिवसाची आठवण असते.
अशाचं आठवणींची पोतडी असते प्रत्येकाकडे. अगणित क्षणांचे जसा घराचा वाढदिवस, गाडीचा वाढदिवस, जाॅयनींग सेपरेशन , प्रवास , प्रमोशन तर कधी अपघात , दुरावा ,मृत्यू अशा आठवणी...
अगदी आवाज , वादळासह आठवणारी.
ग्रेस यांच्या या आठवणी सारखी.
ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता
ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता
अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता
ती गेली तेव्हां रिमझीम पाउस निनादत होता .
किंवा लतादिदींच्या आर्त आवाजात सांगणारी
वो भूली दास्ताँ, लो फिर याद आ गई
नजर के सामने, घटा सी छा गई
कहाँ से फिर चले आए, ये कुछ भटके हुए साए
ये कुछ भूले हुए नगमे, जो मेरे प्यार ने गाए
ये कुछ बिछडी हुई यादे, ये कुछ टूटे हुए सपने
पराये हो गए तो क्या, कभी ये भी तो थे अपने
या वर्षातही तुमच्या जुन्या नव्या आठवणी असतील. कडूगोड, चांगल्यावाईट, त्या सर्व आठवणी तुमच्या सोबत नव्या वर्षात राहोत. ज्या प्रमाणे सेलेब्रिटी स्वतःच्या आठवणीसाठी आर्काईव्हज मॅनेजमेंट करणारा व्यक्ती कामावर ठेवतो किंवा फेसबूकवर ज्या प्रमाणे you have memory on this day of. अशी आठवण जपतो तसेच दुनियेतील कुठल्याही ईतर बाबींशी संबंधापेक्षा स्वतःच्या संवेदनांशी प्रामाणिक राहून या वर्षीच्या आठवणी जपूयात .
त्या सर्व पुढच्या आयूष्यातील प्रगल्भतेसाठी ,परिपुर्णतेसाठी, सकारात्मक बाबींसाठी अन् पुर्नस्मरणरंजनासाठी नक्कीच उपयोगी ठरतील.
(C) प्रशांत पेडणेकर. डिसेंबर २०१५

No comments:
Post a Comment